बंदी असूनही देवरुखात आठवडा बाजार भरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे देवरुख शहरात दर रविवारी भरणारा आठवडा बाजार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद आहे. रविवारी मात्र देवरुखमधे बंदी असतानाही आठवडा बाजार भरलाच शिवाय ग्राहकांनीही मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे परजिल्ह्यातील विक्रेते आज नेहमीप्रमाणे बाजारात हजर होते.

देवरुख नगरपंचायतीने आज अनाऊन्समेंटद्वारे पुढच्या रविवारी बाजार भरला तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी आजच्या विक्रेत्यांवर काय कारवाई केली हे जाहिर करावे अशी मागणी होत आहे.