
मुंबईत गेल्या एकाच दिवसांत कोरोनाचे 1242 नवे रुग्ण आढळले असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 624 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 33 हजार 491 झाली आहे.
मुंबई मृत झालेल्या 41 जणांमध्ये 26 पुरुष आणि 15 महिलाचा समावेश आहे. मृतांमधील 28 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. 11 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. मुंबईत सध्या 29 हजार 347 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 66 हजार 507 झाली असून मृतांचा आकडा 3669 झाला आहे.




























































