जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये लष्कराचे ऑपरेशन ऑल आऊट सुरू आहे. अनंतनागच्या वेरीनागमध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने तीन ते चार दहशतवाद्यांना घेराव घातला असून चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने घेराव घातलेले दहशतवादी हिंमुल मुजाहिद्दीनचे असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सुरक्षा दलाने कुलगामच्या शूच परिसरात शोध मोहिम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून लष्कराने ऑपरेशन ऑल आऊटला गती दिली आहे.

अनंतनागच्या वेरीनागमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेत परिसराला घेराव घातला आहे. जवानांनी परिसराला घेराव घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने कुलगामच्या शूच परिसरातही शोध मोहीम हाती घेतली आहे. सुरक्षा दलाने रविवारी श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.