सुधरा, अजून वेळ गेलेली नाही भाजपचा प्रतिहल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाने सैन्यदलाच्या शौर्यावर प्रश्न उपस्थितीत करणे थांबवावे. जवानांचा अपमान करू नका. सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही, अशी टीका भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेच्या हितासाठी शब्द जपून वापरावेत असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. यावर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करीत डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. डॉ. मनमोहन सिंग हे ज्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्या पक्षाने 43 हजार कि.मी. हिंदुस्थानचा भुभाग चीनला बहाल केला आहे. युपीए सरकारच्या काळात कोणतेही युद्ध न होता आपला भुभाग गमावला आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाने सैन्यदलाच्या शौर्यावर प्रश्न उपस्थितीत करणे थांबविले पाहिजे. त्यांचा अपमान करू नये. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतरही प्रश्न उपस्थितीत केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ या काळात तरी समजून घ्या, सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही, अशी टीका नड्डा यांनी केली आहे.