
अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे याच पोलीस कसून तपास करीत आहे. नक्की चित्रपट मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली की यामागे आणखी काही वैयक्तिक कारण आहे याचा शोध घेतला जात आहे. आत्महत्ये आधी दहा दिवस सुशांत सिंह ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात होता त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत 15 जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे.
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पटनी याची रविवारी चौकशी केल्यानंतर सोमवारी पुन्हा दोन मित्रांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. सिद्धार्थ आणि रिया हे दोघं सुशांतच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. रियाची तब्बल 11 तास पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यानंतर सिद्धार्थची चौकशी करण्यात आली. आता दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी करण्याबाबत पोलीस विचार करीत आहेत. रिया आणि सुशांत यांच्यात प्रेमसंबंधांबरोबरच आर्थिक भागेदारीही होती ही बाब पोलिसांसमारे आली आहे.
सुशांत निर्माता होणार होता
अभिनयाच्या क्षेत्रात चमक दाखवणारा सुशांत एका चित्रपटाच्या निर्मितीतही व्यस्त होता. सुशांतचा मित्र संदीप सिंह हा सुशांत सोबत ‘वंदे भारतम’ या चित्रपटाची निर्मिती करणार होता. याबाबत त्याने इन्स्ट्राग्रामवरही पोस्ट केली आहे. आपण दोघे बिहारी भाऊ या चित्रपट जगतावर राज्य करू आणि तरुणांसाठी आदर्श ठरू तसेच त्यांचा आधार बनू, असे वचन तू मला दिले होतेस. हा चित्रपटाची निर्मिती आपण दोघे मिळून करणार होतो, असे या पोस्टमध्ये संदीपने म्हटले आहे.

























































