दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातील लोकांनाच कामाची संधी, सैफ अली खानने घराणेशाहीला वाचा फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दमदार अभिनेत्यांपेक्षा विशिष्ट वर्गातीलच लोकांना कामाची संधी अधिक दिली जाते. हिंदुस्थानात हे मोठय़ा प्रमाणावर होतं, असे विधान करीत अभिनेता सैफ अली खान याने बॉलीवूडमधील घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे.

ओमकारा चित्रपटातील लंगडा त्यागी या त्याच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर सैफला विचारले असता तो म्हणाला, ‘मी ज्या भूमिका साकारल्या त्याचा प्रभाव इतरांवर पडला. अनेकजण कठीण मार्गाने पुढे येतात तर काही जण सोप्या मार्गाने येतात. एनएसडी आणि फिल्म इन्स्टिटय़ूटमधून प्रतिभेच्या जोरावर काही पुढे येतात तर काही जण आमच्यासारखे आईवडिलांमुळे मिळालेल्या विशेषाधिकारामुळे पुढे येतात. अनेकदा चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळत नाही. कधी कधी ती चांगली संधी ही विशेष अधिकार असलेल्या लोकांना मिळते. हिंदुस्थानात हे अनेकदा घडतं, असे सांगत सैफने घराणेशाहीला वाचा फोडली.