अवकाशातील ‘या’ ग्रहांवरही आहेत जागृत ज्वालामुखी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक वर्षापू्वी पृथ्वीवर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्यातून लाव्हारस बाहेर आला. त्या लाव्हारसामुळे काही पर्वत आणि समुद्रातील काही बेटे तयार झाली आहेत. आजही पृथ्वीवर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. म्हणजे त्यातून कधीही उद्रेक होण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी मृत ज्वालामुखी आहेत. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी या ज्वालामुखीतून लाव्हारसाचा उद्रेक झाला होता. मात्र, आता त्यातून उद्रेक होणार नसल्याने त्यांना मृत ज्वालामुखी म्हणतात. तर निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काही वर्षापूर्वी त्यातून उद्रेक झालेला असतो आणि भविष्यातही उद्रेक होण्याची शक्यता असते. पृथ्वीवरील पर्वतीय प्रदेशांप्रमाणे इतर ग्रहांवरही डोंगराळ भाग आणि खाचखळगे आहेत. तेदेखील ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाले आहेत काय, या रहस्याचा संशोधकांनी उलगडा केला आहे. पृथ्वीप्रमाणेच अवकाशातील आणि आपल्याच सौरमालेतील काही ग्रहांवर जागृत तर काही ग्रहांवर मृत ज्वालामुखी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आपल्या सौरमालेतील सूर्याजवळचा ग्रह म्हणेज बुध. या बुध ग्रहावरही अनेक डोंगररांगा आणि खोल खड्डे आहेत. या ग्रहावर लाखो वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखी असावेत. त्यामुळे बुध ग्रहावर डोंगररांगा तयार झाल्या असाव्यात, असे खगोलतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कालांतराने या ज्लामुखीतील उद्रेक थांबले आणि ते आता मृत ज्वालामुखी आहेत. आता यापुढेही त्यातून उद्रेक होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शुक्र हा आपल्या सौरमलेतील रहस्यमय ग्रह आहे. त्याचा पृ्ष्ठभाग सहसा दृष्टीस पडत नाही. या ग्रहावर नेहमी दाट ढग दाटलेले असतात. त्यामुळेच या ग्रहाचा पृष्ठभाग दिसत नाही. या ग्रहावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत आणि त्यांच्यातून उद्रेकही होत असतो. त्यामुळेच या ग्रहावर दाट ढग जमा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या ग्रहावर अनेक जागृत ज्वालामुखी असल्यानेच या ग्रहाचे तापमान जास्त असल्याचे सांगण्यात येते.

अनेक वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे मानण्यात येते, मात्र, त्याबाबतचे कोणेतही ठोस पुरावे मिळालेले नाही. मात्र, मंगळावर ज्वालामुखीचे उद्रेक झाल्याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत. मंगळावरील ओलंपस मोन्सजवळ आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी असल्याचे संशोधकांनी सांगितले. पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असलेल्या माऊंड एव्हरेस्टपेक्षा तो तीनपट उंच आहे. मात्र, हा ज्वामुखी आता निद्रिस्त अवस्थेत असून यापुढेही त्यातून उद्रेक होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावरही अनेक जागृत ज्वालामुखी होते. चंद्रावर लाव्हापासून बनलेला मैदानी भाग आहे, त्याला मारिया असे म्हणातात. त्यामुळे इतर ग्रहांवरील जीवसृष्टीबाबत ठोस माहिती मिळाली नसली तरी इतर ग्रहांवरील ज्वालामुखीबाबतचे पुरावे संशोधकांकडे आहेत.