
कोरोनावरील, रेमेडेसीवीर, फॅबीपीरावीर आणि टॅझीलोझुमा ही प्रभावी औषधे जून महिन्याअखेरपर्यंत राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. याशिवाय कंटेनमेन्ट झोनमध्ये नेमका किती जणांना संसर्ग झाला आहे हे शोधण्यासाठी ऍन्टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी ऍम्ब्युलन्स ताब्यात
ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी खासगी ऍम्ब्युलन्स ताब्यात घेण्यात येतील. त्यांचा प्रति किलोमीटरचा दर निश्चित वरून त्याच दराने आकारणी करणे सक्तीचे करण्यात येईल.
मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे. तो केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. पदव्युत्तर परीक्षा ऑगस्टमध्ये होणार होत्या. परंतु कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी डॉक्टरांची आवश्यकता आणि पावसाळा यांचा विचार वरून या परीक्षा पुढे ढकलणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.



























































