
कोरोना संकटकाळात अनेक संस्था सामाजिक जाणिव ठेवत मदतीसाठी पुढे येत आहेत. पुण्यात हायवे इन्फिनिटी संस्थेच्या वतीने डॉ. (कॅप्ट.) रितू बियाणी (Ritu Biyani) यांनी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना मास्क आणि महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले. याच बरोबर पाणी बॉटल, पुरी भाजी याचे पॅकेट्स, फरसाण आणि चिवडा पॅकेट याचे वाटप केले.

































































