
फेअरनेस क्रीम ‘फेअर ऍण्ड लव्हली’ मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय हिंदुस्तान युनिलिव्हरने घेतला आहे. अभिनेत्री बिपाशा बासूने या निर्णयाचे स्वागत केले आहे. आपल्याला लहानपणापासून सावळ्या रंगामुळे हिणवल्याचा अनुभव तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितला आहे.
बिपाशाने लिहिलंय, मी लहान असताना नातेवाईकांची चर्चा असायची की बोनी ही सोनीपेक्षा फार सावळी आहे. माझी आईसुद्धा सावळी आहे आणि मी बऱ्याच अंशी तिच्यासारखी दिसते. माझे नातेवाईक माझ्या रंगावर सारखं बोलत राहायचे.
बिपाशाने 15-16 वर्षांची असल्यापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने सुपरमॉडेल ही स्पर्धासुद्धा जिंकली होती. याविषयी तिने लिहिलं, स्पर्धा जिंकल्यानंतर सर्व वर्तमानपत्रांमध्ये हेच लिहिलं होतं की, कोलकाताची सावळी मुलगी किजेती ठरली. सावळा रंग हे मला वर्णन करण्यासाठी विशेषण कसं असू शकतं, असा सवाल तिने केला.गेल्या 18 वर्षांत सौंदर्यप्रसाधनांच्या कंपनींच्या खूप सारे ऑफर्स आल्याचे तिने सांगितलं. काही ऑफर्स तर मला खूप पैसा द्यायला तयार होते. पण मी माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहिले आणि या ऑफर्स स्वीकारल्या नाहीत, असे ती म्हणाली.
मला माझा रंग प्रिय
बिपाशाने लिहिलंय, मी न्यूयॉर्क, पॅरिस येथे मॉडेलिंगच्या कामासाठी गेलेय. तिथे माझ्या रंगाची चांगली चर्चा झाली. तिथे मला जास्त काम आणि अटेंशन मिळाले. तिथेच माझ्या वर्णाचा मला नव्याने शोध लागला. त्यानंतर जेक्हा हिंदुस्थानात आले तेक्हा मला पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. ‘अजनबी’ या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण माझ्या नावासोबत सावळा हा शब्द तसाच राहिला. मला माझा रंग प्रिय आहे. पण हाच नेहमी चर्चेचा मुख्य विषय असायचा,’ असं तिने सांगितलं.


























































