
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गिरगावातील रहिवाशांचे पुनर्वसन उत्तुंग टॉवर्समध्ये केले जाणार आहे. त्यातील ‘जी-3’ हा टॉवर 48 मजली असणार आहे. त्यात 473 निवासी गाळे आणि 137 दुकानांचा समावेश असणार आहे. हा टॉवर उभारण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपन्या उत्सुक असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) आज दिली.
बांधकामासाठी दिग्गज कंपन्या उत्सुक
भुयारी मेट्रोमुळे काळबादेकी आणि गिरगावमधील शेकडो मराठी कुटुंबे बेघर होणार आहेत. आपले पुनर्वसन गिरगावातच केले जावे अशी त्यांची सुरुवातीपासूनच मागणी आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी मोठे टॉवर्स उभारण्याची एमएमआरसीएलची योजना आहे. त्यातील ‘जी-3’ टॉवर उभारण्यासाठी लार्सन ऍन्ड टूब्रो, शापूरजी पालनजी, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, जेएमसी प्रोजेक्ट्स, वॅस्कन इंजिनियर्स, मॉन्टोकार्ले, कॅपासाईट इप्रा प्रोजेक्ट्स, न्याती इंजिनियर्स, मॅन इप्राकन्स्ट्रक्शन, नाथानी पारेख कन्स्ट्रक्शन या कंपन्या इच्छुक आहेत.
के-3 इमारतीच्या बांधकामाला लककरच सुरूकात
काळबादेवी-गिरगाव पुनर्विकास योजनेते एकाच परिसरात सहा ब्लॉक उभारले जाणार आहेत. तीन ब्लॉक्समध्ये के-2, के-3 आणि जी-3 या इमारती असतील तर उर्वरित तीन ब्लॉक्समध्ये के-1, जी-1 आणि जी-2 या इमारती असतील ज्यांचा वापर मेट्रो संबंधित कामासाठी केला जाणार आहेत. के-3 इमारतीच्या बांधकामासाठी एमएमआरसीएलने मेसर्स कॅसकॉन इंजिनियर्सची नियुक्ती केली असून बांधकामाला लककरच सुरूकात केली जाणार आहे.
असा असेल टॉवर
‘जी-3’ टॉकर 48 मजली असणार आहे. त्यात 473 निवासी गाळे, 137 दुकाने आणि 19 कार्यालयांचा समावेश असणार आहे. या टॉवरला तीन मजली बेसमेंट असेल. पहिल्या नऊ मजल्यांवर व्यावसायिक गाळे असतील. दहाव्या मजल्यापासून अठराव्या मजल्यापर्यंत निवासी आणि व्यावसायिक गाळे तर 19 व्या मजल्यापासून 48 व्या मजल्यापर्यंत निवासी गाळे असतील अशी माहिती एमएमआरसीएलकडून देण्यात आली.
गिरगावमधील ही एक महत्त्वाची पुनर्विकास योजना आहे. काळबादेवी आणि गिरगाव भुयारी मेट्रो स्थानकांजवळच या इमारती उभारल्या जाणार आहेत. तिथे उपलब्ध होणारे भूखंड हे छोटे-छोटे असल्याने तिथे क्लस्टर योजनाच यशस्वी होऊ शकेल.
– रणजीतसिंग देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसीएल























































