‘दिल्लीची जबाबदारी माझी आहे, श्रेय ज्यांना हवे त्यांनी घ्या’, केजरीवाल यांचा भाजपला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एकीकर कोरोनाने थैमान घातलेले असताना दुसरीकडे भाजप-आप पक्षांमध्ये श्रेय लाटण्याचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, ‘कोरोनाशी कोणतेही एक सरकार जिंकू शकत नाही, यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल.’ कोरोना संकटात सुरू असलेल्या श्रेयाच्या राजकारणावर ते म्हणाले आहेत की, ‘दिल्लीची जबाबदारी माझी आहे, जर त्यांना याचे श्रेय घ्याचे असेल तर त्यांनी घावे’, असे ते म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘मला कोणत्याही कामाचे श्रेय नकोय. सर्व चांगल्या कामाचे श्रेय त्यांचे आणि सर्व उणीवांची जबाबदारी माझ्यावर आहे. अशा परिस्थिती राजकारण करण्याची गरज नाही, आमचे लक्ष लोकांचे प्राण वाचवण्याकडे आहे.’ असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संकटात केंद्रीय गृह मंत्रालयही सक्रीय झाले आहे. अशातच दिल्ली भाजप आणि आपचे नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत एकमेकांवर आरोप करत श्रेय घेण्याचे राजकरण करत आहेत.