
ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट पाहता 2 जुलै ते 12 जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सरकारी कार्यालयही कमीत कमी कर्मचार्यांसह सुरू राहतील.
#आदेश
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण आणणेसाठी @TMCaTweetAway क्षेत्रामध्ये लॉकडाऊन करणे @CMOMaharashtra @mieknathshinde @ThaneCityPolice @MahaDGIPR #Thane #LockDown #COVID19India pic.twitter.com/boa63yiCSj— DigiThane (@DigiThane) June 30, 2020
कोरोनाचे संकट रोखण्यासाठी ठाणे महानगर पालिकेने 2 जुलै ते 12 जुलै दरम्यान लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. खासगी आणि शासकीय वाहतूक या काळात बंद राहील. फक्त वैद्यकीय आणि अत्यावश्य सेवेसाठी वाहतूक सुरू राहील. तसेच ठाणे शहरातून बाहेर जाण्यासाठीही प्रवाशांना परवानगी असेल. सरकारी कार्यालयातही कमीत कमी कर्मचार्यांसह सुरू राहतील. कर्मचार्यांनी मास्क वापरून आणि सामाजिक अंतर ठेवूनच काम करायचे आहे. या काळात दारूची घरपोच देण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. जर कोणी या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.




























































