कोपरगावात एकाच दिवसात 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले; डॉक्टराही समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

कोपरगावात बुधवारी एका डॉक्टरसह दोन जण असे एकूण 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर आणखी एक जणांचा अहवाल येणे बाकी आहे. सोमवारी 4 जणांचे स्वॅब तपासणीसाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

सोमवारी 4 जणांचे स्वॅब नगर जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी तीन जणांचे अहवाल बुधवारी मिळाले असून तीनही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ओमनगर खडकी रोड येथे 45 वर्षीय डॉक्टर व 65 वर्षीय वडिलांचा तर एक जण टाकळी येथे मुंबईहून सासरवाडीला आलेला पाहुणा असल्याचे समजते. कोपरगावात अद्यापपर्यंत 5 कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. ते सगळे बरे होऊन घरी गेले आहेत. या सर्वांना बाहेरून आलेल्या पाहूण्यामुळे कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या कोपरगावातील कुणालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती. आतापर्यंत 3540 इतक्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ओम नगर व निवारा या चारशे ते पाचशे घरे असलेला परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.