धारावीत आज कोरोनाचे दोन रुग्ण सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एफ/उत्तर विभागात येणाऱ्या धारावीत आज केवळ दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत. धारावीत सध्या 2311 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील 1704 कोरोनामुक्त झाले आहेत तर केवळ 519 सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. त्यामुळे धारावीत क्रीडा संकुल आणि पालिकेच्या शाळेतील एक, अशी एकूण दोन कोरोना सेंटर बंद करण्यात आली आहेत. लवकरच हा आकडा शून्यावर आणू, असा विश्वास एफ/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी बोलून दाखवला.