
मध्य रेल्वेने प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कॅप्टन अर्जून हा रोबोट व्हॅन, तसेच थर्मल ईमेज कॅमेरे अशा आधुनिक यंत्रणांची मदत घेतली असताना आता सीएसएमटी स्थानकात तिकीट तपासनीसांच्या गळ्यात आता पोर्टेबल अनाऊन्समेंट सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सूचना देणे सोपे होत असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकांत टीसींना वेगळीच ड्युटी लावली आहे. या टीसींना तिकीट तपासण्याबरोबरच इतर कामेही करावी लागत आहेत. त्यांना प्रवाशांना शिस्त लावण्याचे, त्यांना ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी आखलेल्या वर्तुळात उभे करणे अशा प्रकारच्या सूचना देण्यासाठी त्यांच्या गळ्यात छोटी अनाऊन्समेंट यंत्रणा देण्यात आली आहे. या पोर्टेबल पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टममुळे प्रवाशांना सूचना देणे सोपे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































