महाकाय वटवृक्ष प्रकरणाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील भोसे येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीच्या महाकाय वटवृक्षावर कुऱ्हाड चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणाची राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी यासंबंधीचा अहवाल सांगली प्रशासनाकडून तातडीने मागविला आहे.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गात मिरज-पंढरपूर मार्गावरील सांगली जिल्ह्यातील भोसे येथील महाकाय वटवृक्ष अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा वटवृक्ष तोडण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. बुधवारी (दि. 15) पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी ‘चिपको आंदोलन’ करून या पुरातन वटवृक्षाला जीवदान द्यावे, अशी मागणी केली होती. पर्यावरणप्रेमींच्या या मागणीची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आणि या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.