बुलढाणा जिल्ह्यात 269 कोरोना निगेटिव्ह, तर 27 पॉझिटिव्ह; 13 रूग्णांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 296 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 269 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोग शाळेतील 4 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोग शाळेतून 23 तर रॅपिड टेस्टमधील 246 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 269 अहवाल निगेटीव्ह आहेत.

Corona vaccine – देशात मानवी चाचणीस सुरूवात, स्वयंसेवकांना दिला डोज; परिणाम आश्चर्यकारक

आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदुरा येथील 55 वर्षीय पुरूष, 18, 45, 20, 26, 9 वर्षीय महिला,  इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरूष, नॅशनल स्कूलजवळ खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 60 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 35  वर्षीय पुरूष, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष व सुलतानपूर ता. लोणार येथील 50 वर्षीय महिला रूग्णाचा  समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 5844 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 310 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 310 आहे.

आज रोजी 94 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5844 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 696 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 310 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 366 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.