
मालवण तालुक्यातील तळाशिल येथील पर्यटन व्यवसायिक मनीष यशवंत तारी (22) या युवकाने शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करून अधिक तपास करण्यात येत आहे.
मनीष पर्यटन व्यवसायात कार्यरत होता. त्यासाठी त्याने गाड्यांची खरेदी केली होती. मनिषचे शालेय व कॉलेज शिक्षण मालवण शहरात झाले होते. त्याच्या आकस्मित मृत्यू मुळे गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

































































