
धामापूर भायजेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. यश रवींद्र महाडिक (22) आणि विजय विश्वास भालेकर (21) या दोघांचा मृत्यू झाला आहे
धामापूर भायजेवाडी येथील पाणलोट मधून बंधारा बांधण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हा बंधारा भरून वाहत आहे. धामापूर पीर येथील पाच जण शनिवारी दुपारी पोहायला गेले होते. यापैकी यश महाडिक आणि विजय भालेकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.





























































