
पुण्यातील दिघी नगर परिसरात स्वत:च्याच 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मुलीच्या आईनेच पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्या नराधम बापाला अटक करण्यात आली. हा बाप मुलीला फिरायला नेतो सांगून तिच्यावर बलात्कार करायचा.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील या नराधमाने दोन आठवड्यांपूर्वी पत्नी घरात नसताना मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर या गुरुवारी त्याने मुलीला फिरायला घेऊन जातो सांगत तिला एका निर्जन स्थळी नेले व तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्या नराधम बापाला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथे एका नराधमाने स्वत:च्या 8 वर्षांच्या मुलीवर टेम्पोमध्ये बलात्कार केल्याचे समोर आले होते. उदयपूरमधील सुरफाला काया गावात ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 36 वर्षीय व्यक्तीला अटक केलेली.





























































