
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने कोदवली नदीने धोक्याची पातळी गाठली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास राजापूर शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. गेले तीन-चार दिवस जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाले तुडूंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील धरणेही पाण्याने भरली आहेत. रविवारी सायंकाळी 5 वाजता कोदवली नदीने धोक्याची पातळी गाठल्याने राजापूर शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



























































