
हिंदुस्थान नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी तीन हिंदुस्थानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक हिंदुस्थानी नागरिक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
बिहारमध्ये हिंदुस्थान नेपाळ सीमेवर नेपाळी पोलिसांनी हिंदुस्थानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. यात एका हिंदुस्थानी नागरिकाला गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. जखमी नागरिकाला किशनगंज रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
One Indian injured after Nepal Police shot at three Indian men near India-Nepal border in Kishanganj. Injured shifted to hospital. Investigation underway: SP Kishanganj, Bihar
— ANI (@ANI) July 19, 2020
स्मगलर असल्याचा नेपाळी माध्यमांचा दावा
हिंदुस्थानी नागरिक हे स्मगलर असल्याचा दावा नेपाळी माध्यमांनी केला आहे. हिंदुस्थान नेपाळ सीमेवर सुरक्षा कडक केल्याने दोन्ही पक्षांत वाद निर्माण झाला. हिंदुस्थानी नागरिक काही वस्तू नेपाळमध्ये बेकायदेशीपणे आणून विकत होते, हे नागरिक स्मगलर असल्याचे नेपाळी माध्यमांनी म्हटले आहे.



























































