कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भिकाऱयांवर बंदी घाला, हायकोर्टात आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर काम केले जात आहे. असे असले तरी रस्त्यावर भीक मागणाऱया भिकाऱयांद्वारे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या भिकाऱयांवर बंदी घालण्यात यावी तसेच राज्य सरकारने भिक्षेकरी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत पुण्यातील राष्ट्रशक्ती संघटनेच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

लॉक डाऊन टप्प्याटप्प्याने उठविण्यात येत असून रस्त्यावरील वर्दळ हळूहळू वाढत आहे. पुण्यातील रेनबो संस्थेने पालिकेमार्फत भिकाऱयांचे 2016 साली सर्वेक्षण केले होते. त्यानुसार 10 हजार 427 लहान मुले भीक मागताना आढळून आली आहेत. आता पर्यंत यासंख्येत वाढ झाली असून रस्त्यावर भीक मागण्यासाठी या मुलांचा वापर होत आहे. या मुलांचे पुनर्वसन करण्यात यावे्, भिक्षेकरी प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी शासनाने करावी, केंद्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत या मुलांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी करत ज्ञानेश्वर दारकटकर यांच्या राष्ट्रशक्ती संघटनेने ऍड. शेखर जगताप यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना कोरोनाच्या कामातून वगळले