बीड हादरले, एकाच दिवसात कोरोनाचे तीन बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रूग्णांच्या मृत्युची संख्याही वाढत आहे. सोमवारी दिवसभरामध्ये तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 17 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे बीड जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना पॉझिटिव्हची संख्या 350 च्या पार केली असताना उपचार घेणार्‍या रूग्णांचा मृत्युही मोठ्या प्रमाणावर होत आहे. रविवारी एकाच दिवशी दोन रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी बीड जिल्ह्यातील तीन रुग्णांचा एकाच दिवशी  मृत्यू झाला आहे. त्यात गेवराई तालुक्यातील एक रूग्ण आहे. दुसरा परळी येथील शिक्षक संभाजीनगर येथे उपचार घेताना मृत्युमुखी पडला. तर सायंकाळी बार्शीनाका भागातील एका वृद्ध महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे.