मुंबईत 995 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 995 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 905 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 73 हजार 555 वर पोहोचली आहे.

मुंबईत 62 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 814 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 893 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 43 हजार 083 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 3,262 वर पोहोचली आहे.