
आपल्या मंचावरून वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांसाठी फेसबुकने ‘इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ अर्थात आयपीआरएससोबत भागीदारी केली आहे. यामुळे या संघटनेशी संबंधित गायक आणि संगीतकारांना आपले टॅलेंट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून करोडो लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. आयपीआरएस ही गीतकार, संगीतकार यांच्या स्वामित्व हक्कासाठी झटणारी संघटना आहे. ही भागीदारी रॉयल्टीच्या नियमांचे पालन करणार असून फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना या मंचावरून हजारो गाणी निवडता येतील. या गाण्यांचा उपयोग युजर्सना म्युझिक स्टिकर आणि व्हिडीओ स्टोरीसाठी करता येणार आहेत. या भागीदारीमुळे युजर्सना कोणत्याही हिंदुस्थानी भाषेतील आपल्या आवडत्या प्रकारातील शेकडो गाणी निवडता येतील.




























































