निद्रानाशाच्या समस्येविरोधात माधुरी सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समस्या दूर होऊन त्यांना शांत झोप लागावी यासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पुढाकार घेतला आहे. माधुरीच्या सुमधुर आवाजात काही कथा रेकॉर्ड करण्यात आल्या असून त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होणार आहे. माधुरीने सांगितलेल्या कथा हिंदी आणि मराठी भाषेत आता धनी अॅपवर उपलब्ध आहेत.

वाढत्या तणावामुळे लोकांमधील झोपेची कमतरता लक्षात घेता त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी धनी अॅपने हे पाऊल उचलले आहे. उत्तराखंड आणि दार्जिलिंगच्या सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात या कथा तयार केल्या आहे. माधुरी म्हणाली, माझ्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या सभोवतालच्या वातावरणामुळे चिंता आणि तणाव खूप वाढले आहे. म्हणूनच सुखदायक आणि आनंदी विचारांच्या गोष्टी सांगून लोकांना शांत झोप लागण्यासाठी मदत करणे म्हणजे धनीने घेतलेला एक उत्तम उपक्रम आहे.