
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर ब़ॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. अभिनेत्री कंगना रनौत एकीकडे घराणेशाहीवरून जोरदार टीका करत असताना दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी बॉलिवूड या संकल्पनेवरच घाला घालत बॉलिवूडच्या सदस्यत्वाचा राजिनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. सिन्हा यांनी ट्विटरवरून हे जाहीर केले असून त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि हंसल मेहता यांनी पाठिंबा दिला आहे.
ENOUGH!!!
I hereby resign from Bollywood.
Whatever the fuck that means.— Anubhav Sinha (Not Bollywood) (@anubhavsinha) July 21, 2020
अनुभव सिन्हा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘बस्स झालं, मी इथे बॉलिवूडचा राजीनामा देतोय’, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सुधीर मिश्रां यांनी देखील ट्विट करत बॉलिवूडविरोधात मोर्चा खोलला. ‘बॉलिवूड काय आहे? मी इथे सत्यजित रे, राज कपूर, गुरुदत्त, रित्विक घाटक, बिमल रॉय, मृणाल सेन, ऋषिकेश मुखर्जी, कासिफ, विजय आनंद, जावेद अख्तर, तपन सिन्हा, गुलझार, शेखर कपूर, केतन मेहना, भारतन, अरविंदन यांच्या चित्रपटसृष्टीत काम करायला आलो. मी त्याच चित्रपटसृष्टीत राहणार. बॉलिवूड सोडा व हिंदुस्थानी सिनेमाकडे चला’, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यानंतर अनुभव सिन्हा यांनी हे रिट्विट करत ‘आणखी एक जण बॉलिवूडच्या बाहेर पडला. आता आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीत राहून चित्रपट बनवणार’ असे लिहले आहे.
What’s Bollywood?I came 2be partof Cinema inspired by Satyajit Ray ,Raj Kapoor,Guru Dutt,Ritwick Ghatak,Bimal Roy,Mrinal Sen , Hrishikesh Mukherjee,KAsif,Vijay Anand ,Javed Akhtar,Tapan Sinha, Gulzar ,Shekhar Kapur,Ketan Mehta , Bharatan n Aravindan etc.Thatswhere I’ll always be.
— Sudhir Mishra (@IAmSudhirMishra) July 21, 2020
या दोघांनंतर हंसल मेहता यांनी देखील ‘सोडले, खरंतर हे कधी माझ्यासाठी अस्तित्वातच नव्हते’, असे ट्विट केले आहे. अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटरवर नावापुढे (Not Bollywood) लिहले आहे.
































































