
राज्यात नवीन कोरोना रुग्ण सापडण्याचा आज उच्चांक झाला. दिवसभरात तब्बल 10 हजार 576 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहेत. आज 5552 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.62 टक्के झाले असून आतापर्यत 1 लाख 87 हजार 769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 36 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 280 मृत्यूंची नोंद झाली. नोंद झोलल्या मृत्यूंपैकी 280 मृत्यू हे मुंबई मनपा-58, ठाणे-16, ठाणे मनपा-13, नवी मुंबई मनपा-3,कल्याण-डोंबिवली मनपा-6, उल्हासनगर मनपा-2, भिवंडी निजामपूर मनपा-3, मीरा-भाईंदर-7, वसई-विरार मनपा-4,पालघर-1,रायगड-1,पनवेल-3, नाशिक-2, नाशिक मनपा-4, अहमदनगर-3, अहमदनगर मनपा-3, धुळे-1, जळगाव-8, जळगाव मनपा-1, नंदूरबार-1, पुणे-3, पुणे मनपा-36, पिंपरी-चिंचवड मनपा-18,सोलापूर-6, सोलापूर मनपा-6, सातारा-2, कोल्हापूर-6, कोल्हापूर मनपा-10, सांगली-1, सांगली मिरज कुपवाड मनपा-3, रत्नागिरी-3, संभाजीनगर-4, संभाजीनगर मनपा-23, जालना-1, हिंगोली-1, परभणी-2, लातूर-2, लातूर मनपा-1, धाराशिव-1, नांदेड मनपा-3, अकोला-1, अकोला मनपा-2, बुलढाणा-1, नागपूर मनपा-3, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य 1 अशी नोंद आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 16 लाख 87 हजार 213 नमुन्यांपैकी 3 लाख 37 हजार 607 नमुने पॉझिटिक्ह (20 टक्के) आले आहेत. राज्यात 8 लाख 58 हजार 121 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 975 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 280 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत आतापर्यंत 75 हजार कोरोनामुक्त
मुंबईत आज कोरोनाचे 1310 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 58 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1563 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 75 हजार 118 वर पोहोचली आहे. मुंबईत 58 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 872 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 582 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 50 हजार 459 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 4,572 वर पोहोचली आहे




























































