
कोरोना साथरोगाचा फटका शासकीय दुग्ध व्यवसायालाही बसला आहे. चंद्रपुरात अर्ध्या लिटरच्या पिशव्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, रोज सुमारे तीन हजार लिटरची मागणी कमी झाली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाकाळ सुरू असून, यामुळं अनेक उद्योग आणि व्यवसायांना घरघर लागली. यात शासकीय उपक्रमांचाही समावेश आहे. चंद्रपूरच्या शासकीय दूध डेअरीलाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. या डेअरीत अर्ध्या लिटरच्या पिशव्यांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळं उपलब्ध एक लिटरच्या पिशव्यांची विभागणी करत त्यात अर्धा लिटर दुध भरलं जात आहे. हे करताना वजन आणि किमतीचा शिक्का या पिशव्यावर येत नाही. त्यामुळं ग्राहकांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या पिशव्यांची मागणी केली असली तरी त्या पोचल्या नसल्यानं डेअरीला ही तडजोड करावी लागत आहे. यासोबतच वितरकांकडून दुधाची मागणीही घातली आहे. रोज सुमारे तीन हजार लिटर दुध शिल्लक राहत आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची हाही मोठा प्रश्न आहे. आता या शिल्लक दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.




























































