मुंबईत 1,090 नवे रुग्ण, 52 जणांचा मृत्यू; एका दिवसात 617 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत शनिवारी कोरोनाचे 1,090 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 617 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 78 हजार 877 वर पोहोचली आहे.

मुंबईत 52 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 033 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 071 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 70 हजार 330 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 7,981 वर पोहोचली आहे.