
कोरोनाचे वेगाने निदान होऊन रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी एकाच वेळी मुंबई, नॉयडा आणि कोलकाता येथे ‘हाय थ्रुपूट कोविड चाचणी सुविधां’चे ऑनलाइन अनावरण करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
या अनावरण प्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. ही सुविधा मुंबईत केईएम रुग्णालयासमोरील नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टीव्ह हेल्थ, कोलकात्यात नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉलरा ऍन्ड एन्टरीक डिजिस तर नोएडा येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन ऍण्ड रिसर्च या संस्थांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या अद्ययावत सुविधेमुळे एकाच दिवशी दहा हजार कोरोना चाचण्या करता येणार आहेत.
























































