
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. सागर पाटील असे तरुणाचे नाव असून तो हनुमान नगरचा रहिवासी होता.
कोपरगामधील सागर पाटील हा तरुण गवंडी काम करत होता. घरात तो आणि त्याचे वडील असे दोघेच राहत होते. वडिलांना अर्धांगवायुचा झटका आल्याने अंथरुणाला खिळून होते. मंगळवारी सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी राजुच्या वडिलांनी पाहिले असता पण त्यांना काहीच करता आले नाही. अखेर शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल आहे. दरम्यान राजूने आत्महत्या का केली याचे कारण कळालेले नाही.























































