
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना मलेशिया डेवलपमेंट बरहाद (१एमडीबी) स्टेट फंडात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या 7 प्रकरणांत हायकोर्ट न्यायमूर्ती मोहम्मद गजाली यांनी नजीब यांना दोषी ठरवले. सुमारे 94 दिवस हा खटला चालला होता. 67 वर्षीय नजीब यांनी सत्ता आणि अधिकाराचा गैरवापर करीत देशाचे कोट्यवधी रुपये लुटले असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.

























































