
बुलढाण्यात बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून सर्व निकालात मुलींचा बोलबाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 96.10 टक्के लागला आहे. निकालामध्ये अमरावती जिल्हा विभागात प्रथम आला आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून एकूण 43 हजार 922 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 43 हजार 669 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 41 हजार419 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 78 मुले, तर 17 हजार 951 मुली आहेत. त्यापैकी 21 हजार 04 मुले आणि 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण 38 हजार 469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची टक्केवारी 95.18 असून मुलींची टक्केवारी 97.24 आहे.
जिल्ह्यात 40 हजार 250 नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 40 हजार 29 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या नियमित विद्यार्थ्यांपैकी 21 हजार 14 मुले व 17 हजार 455 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 16 हजार 87 विद्यार्थी डिस्टीक्शन, 13 हजार 731 विद्यार्थी ग्रेड 1, 7 हजार 109 विद्यार्थी ग्रेड 2 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात दहावीच्या निकालात तब्बल 172 शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे. तर दोन शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
जिल्ह्यात 3640 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. त्यापैकी 3030 पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी 83.24 आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेस नोंदणी केलेले मुले 2720 व मुली 952 आहेत. त्यापेकी 2696 मुलांनी, तर 944 मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी 2176 मुले व 854 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्णतेची मुलांची टक्केवारी 80.71 व मुलींची 90.47 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 98.07 टक्के निकाल सिंदखेडराजा तालुक्याचा, तर सर्वात कमी निकाल नांदुरा तालुक्याचा 92.24 टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये बुलढाणा 97.94 टक्के, मोताळा 96.31 टक्के, देऊळगावराजा 97.88 टक्के, चिखली 97.18 टक्के, लोणार 94.77 टक्के, मेहकर 96.82 टक्के, खामगाव 95.73 टक्के, शेगाव 94.43 टक्के, जळगाव जामोद 94.15 टक्के, मलकापूर 96.92 टक्के, संग्रामपूर 92.82 टक्के निकाल लागला आहे.






























































