मंत्रिमंडळ निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कंत्राटदारांना सूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralay

कोव्हिडची महामारी ही नैर्सिगक आपत्ती गृहीत धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसर सरकारी कामांच्या पूर्ततेची मुदत वाढविण्याची विनंती कंत्राटदाराने केल्यास त्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देणार आहे. त्याचप्रमाणे 50 टक्याहून अधिक रकमेचे काम पूर्ण झाल्यानंतर 50 टक्के अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे.

धर्मादाय संघटनांतील पदोन्नतीत सुधारणा

धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येणार आहे.

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषास मान्यता देण्याचा बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली यांच्यासाठी मोठया प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 100 कोटी रुपये असेल तर 100 कोटीपेक्षा अधिक अथवा 200 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल. मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोठया प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 200 कोटी रुपये असेल तर 200 कोटीपेक्षा अधिक अथवा ३०० रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.