
अमरावती शहर व जिल्ह्यात कोरोना संक्रमणाने थैमान घातले असून बुधवारी विक्रमी 119 नवे रुग्ण आढळुन आले. आज दुपारपर्यंत आलेल्या अहवालात नव्याने 57 रुग्ण आढळुन आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 2014 वर पोहोचली आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाखेने काल रात्री पाठविलेल्या अहवालात एकाच वेळी विक्रमी 119 नवे रुग्ण सापडल्याची म्हटले होते. तीच गती आज सुद्धा कायम होती. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालात 57 पॉझीटिव्ह रुग्ण आढळुन आले आहे. हे सर्व रुग्ण शहरी भागातील असून ग्रामीण भागात खोलापूर, भातकुली सारख्या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कालरात्री पर्यंत 1364 रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालातील सर्व रुग्णांना वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. त्यामुळे दाखल झालेल्या रुग्णाची संख्या 2050 च्या जवळ पोहचली आहे. यातील 42 रुग्ण हे नागपूरला दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 27 रुग्णांना नागपूर येथे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील 54 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सुमारे 575 रुग्ण अद्यापही उपचारार्थ दवाखान्यात दाखल आहे. गेल्या पंधरा दिवसापासून अमरावतीत कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे प्रत्येकादिवशी 50 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित आढळुन येत आहे. त्यामुळे हा आकडा अचानकपणे वाढला आहे..






























































