कोल्हापूर – गेल्या 24 तासात 346 रुग्ण आढळले, बाधितांचा आकडा 6 हजार पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळालेल्या गेल्या २४ तासांतील आकडेवारीनुसार एकुण ३४६ नवे कोरोना पाॅझीटिव्ह रुग्ण आढळले. आज सकाळी २१८ पैकी ५० अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काल ५ हजार ७९९ वरुन आज बाधितांची एकूण संख्या ६ हजार १४५ झाली होती.

दरम्यान चोवीस तासांत बरे झालेल्या २१४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकुण २ हजार ५३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १७६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ४३५ पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.