चौथ्या मजल्यावरून  पडून एमएमआरडीएच्या अधिकार्‍याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

एमएमआरडीएमधील वरिष्ठ अधिकार्‍याचा राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून  पडून मृत्यू झाला. कुलविंदर सिंग कपूर असे त्याचे नाव आहे. बीकेसी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

कुलविंदर हे एमएमआरडीए मध्ये वरिष्ठ पदावर काम करत होते. ते एमएमआरडीए अधिकार्‍यासाठी असलेल्या वसाहतीत राहत होते. शुक्रवारी रात्री ते राहत्या घरातील बालकनीतुन खाली पडले. हा प्रकार इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच बीकेसी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी कुलविंदर यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे.

घात की अपघात?

कुलवेंद्र कपूर हे चौथ्या मजल्यावरून कोसळले आहेत. त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्याती आली असून पुढील तपास सुरू आहे, असे वरिष्ठ निरीक्षक आनंद मुळ्ये यांनी सांगितले.