
मुंबई लाइफ लाइन लोकल ठप्प असल्याच्या काळापासून मुंबईकरांसाठी सुरूवातीपासून सेवा देणार्या बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत 27 कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्षात मृत्यूची संख्या कितीतरी जादा असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. बेस्टमध्ये आतापर्यंत 1490 जण कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी 1152 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
बेस्टने लॉकडाऊनच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच अत्यावश्यक कर्मचार्यांसाठी बसेस चालविल्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच बेस्ट कामगारांमध्ये कोरोना संसर्ग काढला. कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना चांगल्या दर्जाचे मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्याची मागणी अनेक कामगार संघटनांनी केली. कमी फेर्यांमुळे बसेसमध्ये गर्दी काढल्याने बेस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे म्हटले जाते.


























































