
गोव्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 337 रुग्ण आढळले असून पाच जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे संकट आणखी गडद झाल आहे. गोव्यात आतापर्यंत 53 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1 हजार 809 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गोव्यात आतापर्यंत 6 हजार 530 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 4 हजार 668 जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज देखील 1 हजार 809 रुग्ण उपचार घेत असून तब्बल 53 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. मांगोर हिल नंतर राज्यभर कोविडचा सामुदायिक प्रसार झाला त्याचा सगळ्यात जास्त फटका मूरगाव तालुक्याला बसला आहे.मृतांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मूरगाव तालुक्यातील होते.
आज दिवसभरात पाच जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. यामध्ये सडा येथील 72 वर्षाय पुरुष,झुवारी नगर येथील 54 वर्षीय पुरुष,न्यू वाडे येथील 72 वर्षीय महिला, दुर्भाट येथील 54 वर्षीय पुरुष आणि बायणा येथील 45 वर्षाय महिलेचा कोविडमुळे मृत्यू झाला.























































