
गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये पुराचा कहर सुरूच आहे. पुरामुळे राज्यातील 14 जिल्ह्यांना फटका बसला असून 50 लाख हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी बचाव कार्य सुरू आहे.
पुराचा सर्वाधिक फटका सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, चंपारण सह 14 जिल्ह्यांतील 1043 ग्रामपंचायतीच्या गावांना बसला आहे. पुरामुळे अनेक रस्ते ठप्प झाले आहेत. छपरा मुझफ्फरपूर, मोतिहारी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. दरभंगामध्ये छोटे बांध तुटल्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी घुसले आहे. उत्तर बिहारमधील पूर ओसरण्याचे नाव घेत नसल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत. मुजफ्फरपुरमध्ये बाया नदीच्या पुराचे पाणी 12 गावांमध्ये शिरले आहे. दरभंगा येथील महाजनी बांध फुटल्याने घराघरात पाणी शिरुन हाहाकार उडाला आहे. उत्तर बिहारातील प्रत्येक गंडकी, बागमती वगैरे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.
27 हजार नागरिकांना आश्रय
94 हजार कुटुंबांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आतापर्यंत 116 कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबांनाही लवकरच मदत करण्यात येईल असे बिहार प्रशासनाचे अप्पर सचिव रामचंद्रडु यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, राज्याच्या अनेक जिल्ह्यात मिळून एकुण 1340 सामुदायिक स्वयंपाकघरे सुरू करण्यात आली असून 9 लाख लोकांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे. 19 जिल्ह्यामध्ये बचाव छावण्या उभारण्यात आल्या आहेत. त्यात 27 हजार नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. यात सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पूर्वी चंपारण, पश्चिम चंपारण, खगडिया, सारण, समस्तीपूर, सीवान और मधुबनी हे जिल्हे आहेत.
























































