
नगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कोरोनाबाधितांच्या संख्येत 82 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1890 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी 263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 4025 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5993 झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून सोमवारी दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 43 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होते. कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा 28, संगमनेर 2, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 3, कॅन्टोन्मेंट 3, पारनेर 3, शेवगाव 1, कोपरगाव 1 आणि जामखेड येथील 1 रुग्ण यांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील 39 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळून आले.
जिल्ह्यात सोमवारी एकूण 263 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा 113,संगमनेर 55, राहाता 10, पाथर्डी 18,नगर ग्रामीण 3,श्रीरामपूर 8, कॅन्टोन्मेंट 3, नेवासा 4, श्रीगोंदा 5, अकोले 18, राहुरी 2, कोपरगाव 7, जामखेड 1, कर्जत 11 आणि इतर जिल्हातील 5 जणांचा त्यात समावेश आहे. सोमवारी 263 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4025 झाली आहे. तर सध्या 1890 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे.





























































