पुणे – चंदनाचे झाड चोरून नेणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime-spot

सोसायटीच्या आवारातील चंदनाचे झाड तोडून चोरुन नेणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. ही घटना काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सहकारनगरमधील राजेंद्र सोसायटीत घडली.

अविनाश संजय ठोंबरे (वय 21, रा, लोणी भापकर, बारामती ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अतुल लिमये (वय 58,  रा. सहकारनगर ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल पहाटे चारच्या सुमारास अविनाशने सहकारनगरमधील राजेंद्र सोयायटीच्या आवारातील चंदनाचे झाड कापले. त्यानंतर झाडाचे तुकडे करुन  चोरुन नेले होते. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी शोध घेउन अविनाशला अटक  केली. याप्रकरणी पोलीस हवालदार आर. यू.जाधव तपास करीत आहेत.