
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अंदमान-निकोबारला सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलची भेट दिली. ही केबल चेन्नईपासून पोर्ट ब्लेअरपर्यंत समुद्राच्या आतून टाकण्यात आली आहे. या केबलमुळे आता अंदमानमध्ये इंटरनेट सुस्साट गतीने चालणार आहे. देशाच्या इतिहासासाठी अंदमानला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवणे ही देशाची जबाबदारी होती. लवकरच अंदमानची ‘वर्ल्ड टुरिस्ट स्पॉट’ म्हणून ओळख तयार होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी केबलच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
अवघ्या दीड वर्षात जवळपास 2300 किलोमीटर लांबीच्या फायबर केबलचे काम पूर्ण केले आहे. कोरोनाचे संकटही हे काम रोखू शकलेले नाही. समुद्रात फायबर केबल टाकणे व त्याचवेळी कामाची गुणवत्ताही राखणे हे सोपे काम नव्हक्हते. ही केबल म्हणजे अंदमानच्या लोकांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आनंदाची भेट आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
























































