तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने आज तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या महिन्यात कुटुंब कल्याण आयुक्त पदावरून  विशेष विक्रीकर आयुक्तपदी बदली झालेल्या अनुप कुमार यादव यांची आता आदिवासी विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांची कामगार विभागाच्या सचिवपदी तर दिलीप हळदे यांची महाराष्ट्र राज्य पणन सहकारी महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.