सरहद्दीवर ताकदवान योद्ध्याला पाठवले जाते, विधानसभेतील जागाबदलावर सचिन पायलटांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानचे सत्तानाट्य संपले असले तरी काँग्रेस नेत्यांमध्ये अजूनही धुसफूस आहे. शुक्रवारी विधानसभेचे अधिवेशन सुरू होत असतानाच माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी जागाबदलावर मनातील खदखद बोलून दाखवली. सभागृहात येऊन पाहतो तर माझी सीट शेवटच्या रांगेत ठेकली आहे. सीमेवर सर्वात ताकदवान योद्ध्याला तैनात केले जाते. मी जोपर्यंत या बाकाकर बसलोय, तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे, असा टोला पायलट यांनी लगाकला.

राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनाचा शुक्रवारचा पहिला दिवस काँग्रेसमध्ये परतलेल्या बंडखोरांच्या जागाबदलावरून गाजला. सचिन पायलट यांना विधानसभा अध्यक्षांनी शेवटच्या रांगेतील 127 क्रमांकाची सीट दिली. त्यावर पायलट म्हणाले, माझी नवीन जागा ही सरहद्द आहे. जे काही बोलायचे होते, ऐकायचे होते, आम्हाला ज्या डॉक्टरांपुढे आपल्या दुखण्याबाबत सांगायचे होते, ते सगळे सांगून झालेय. कितीही गोळीबार होऊ दे, सरहद्दीवर ढाल आणि कवच बनून उभा राहीन, अशी भूमिका पायलट यांनी मांडली.