
मनसेचे शहराध्यक्ष सुनील इरावार (26) यांनी रविवारी सकाळच्या सुमारास राहत्या घराच्या पोर्चमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे किनवट गोकुंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘राजकारण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने यापुढील माझे जीवन मी माझ्या मनाने संपवीत आहे. मला माफ करा, याबद्दल कोणालाही त्रास देऊ नका’, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.
मारोती इरावार यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे किनवटला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय गणेश पवार करीत आहेत. आज दुपारी गोकुंदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






























































