‘तालीम-2’चे टीझर पोस्टर प्रदर्शित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करुणावी क्रिएटरची निर्मिती तसेच दिग्दर्शक नितीन रोकडे यांच्या आगामी ‘तालीम-2’ या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे संकलन करणाऱया नितीन रोकडे यांनी यापूर्की ‘तालीम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘तालीम’मधून कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्याकर यशस्कीपणे मांडणाऱया नितीन रोकडे यांच्या ‘तालीम-2’मध्ये आपल्या देशासाठी असणारी सुवर्ण पदकाची शर्यत पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची कथा नितीन रोकडे यांची असून पटकथा संदीप कुमार रॉय, मधुलिता दास आणि नितीन रोकडे यांची आहे. अभिजीत श्वेतचंद्र, दीक्षा एस. प्रशांत मोहिते, अर्जुन कुसंबी, महेश पाटील, विष्णू जोशीलकर आदींच्या चित्रपटात महत्त्कपूर्ण भूमिका आहेत.